जागतिक बंधुत्व दिनानिमित्त राजयोगी ब्रम्हाकुमारी प्रकाशमणी (दादी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पेण येथील गुजराती समाज सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर ब्रह्माकुमारीज ईश्वरीय सेवा केंद्र पेण, गुजराती समाज पेण, कच्छ युवक संघ पेण, भाऊसाहेब नेने महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना व ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन ब्रह्माकुमारी सेवा केंद्र पनवेलच्या प्रमुख तारादीदी यांच्या हस्ते करण्यात आले.