लातूर -लातूर तालुक्यातील मुरुड अकोला येथे बैल पोळ्यात बैलांसमोर महिला नाचविल्या प्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती गातेगांव पोलिसांनी आज 25 ऑगस्ट रोजी आठ वाजताच्या दरम्यान दिली.सदर गुन्हा जिल्हा दंडाधिकारी यांच्या कायदा व सुव्यवस्था सुबाधित ठेवण्यासाठी 8 ऑगस्टपासून 22 ऑगस्टच्या मध्यराञीपर्यंत दोन्ही दिवस धरुन लागु असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) आदेशाचे उल्लंघन केले.