ऐन पोळा सणाच्या दिवशी दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या दरम्यान नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात फुलवळ येथे मन हेलावून लावणारी घटना घडली आहे. अतिवृष्टी, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मयत सूर्यकांत मंगनाळे वय वर्षे 46 या अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या निधनाचा मानसिक धक्का बसलेल्या मयताची आई देऊबाई मंगनाळे वय वर्षे 70 आईने देखील घटनेच्या २४ तासाच्या आत प्राण सोडले. एका पाठोपाठ दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईक आणि गावकऱ्यांवर आली.