ठाणे - ठाणे जिल्ह्यामध्ये मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र विशेष मोहीम दिनांक २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या दरम्याने राबविली जात आहे. यामध्ये नेत्र तपासणी पासून ते शस्त्रक्रियेपर्यंत सर्व उपचार हे मोफत केले जाणार आहे. तरी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांनी या अभियानाचा लाभ करून घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.