शहापूर तालुक्यातील उबाठा सेना, शरद पवार गट तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. शहापूर तालुका उबाठा सेनेच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्ष व शिरोळचे सरपंच संतोष आरे यांच्या नेतृत्वाखाली 'उबाठा' च्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होते.