मराठी कुटुंबीयांना दादागिरी करत शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीय इसमाला मनसेकडून जय भवानी रोड येथे चोप देण्यात आला होता.सदरचा व्हिडिओ सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमांवर व्हायरल होताच उपनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.नाशिकरोड कोर्टात त्यांना हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला आहे.