कराड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने दोन संशयित आरोपींना अटक करून गावठी पिस्तूल आणि जिवंत राऊंड जप्त केले आहेत. यासंदर्भात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता माहिती देण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नव्याने पदभार घेतलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी पहिल्यांदाच धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.