लातूर,-अज्ञान हेच मानवाच्या दुःखाचे मूळ कारण आहे.आणि अज्ञानामुळेच मानवाच्या जीवनात दुःखाचा प्रवेश होतो. त्यासाठी जीवनातील दुःख समजून घेऊन आपल्याला त्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. अज्ञान म्हणजे केवळ माहितीचा अभाव नाही, तर आपल्या जीवनातील गोष्टी आणि वास्तवाकडे दुर्लक्ष करणे होय.असे प्रतिपादन भंते डॉ. यश कश्यपायन महास्थवीर यांनी प्रतिपादन केले असल्याचे आज दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.