बागलाणच्या आराई येथे आरम नदीपात्रात खालच्या बंधार्यावर अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ Anc: आज दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तालुका बागलाण येथील आरम नदीपात्रात खालच्या बंधाऱ्याजवळ अज्ञात मृतदेह वाहून आला असल्याचे समजल्यानंतर खळबळ उडाली सदर घटनेची माहिती मिळताच आराईचे पोलीस पाटील कारभारी भदाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व सटाणा पोलीस स्टेशनला याबाबत कळविले सटाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर घटनेचा पंचनामा केला.