धुळे शहरातील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेते इर्शाद जहागीरदार लवकरच एमआयएममध्ये प्रवेश करणार असून, त्यांनी नुकतीच खासदार असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांची भेट घेतली आहे. आगामी काळात विशेष कार्यक्रमात जहागीरदार शेकडो समर्थकांसह अधिकृतरित्या पक्षप्रवेश करतील. त्यांच्या या पावलामुळे शहरातील एमआयएमची ताकद वाढणार असून, आगामी निवडणुकांवर याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.