अकोट नगर परिषदेच्या वाढीव कर आकारणी विरोधात उच्च न्यायालयात आज 26 ऑगस्ट रोजी जनहित याचिका दाखल करण्यात आले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी दिली आहे. माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी नगरपालिकेने लादलेली अवास्तव व वाढीव मालमत्ता करवाढ प्रक्रिया रद्द करण्यासाठी जनतेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलीआहे या याचीकेकडे शहरवासी यांचे लक्ष लागले आहे.