नेहरू मैदान रामटेक येथे शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता पासून भव्य शेतकरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून श्री श्री रविशंकर यांच्या पावन सानिध्यात रामटेक भागातून शेतकऱ्यांच्या समृद्धीची दारे उघडली जाणार असल्याचा विश्वास राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी गुरुवार दिनांक 11 सप्टेंबरला दु. तीन वाजता च्या दरम्यान त्यांच्या जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे एका प्रेस मीट द्वारे केला आहे