संग्रामपूर तालुक्यातील एकलारा ते वरवट बकाल रोडवर २८ ऑगस्ट रोजी दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गणेश हरिदास ढोले वय ३२ वर्ष अजय सुनील लहासे वय २२ वर्ष हे दोन युवक जागीच ठार झाले.तर सत्यभामा झांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तामगांव पोलीस मृत्यूची नोंद केल्याची माहिती २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.