भारतीय सैन्य दलामध्ये भरती सुरू असून तुम्हाला मी भरती करतो, असे सांगून एक लाख ८४ हजार रुपये घेऊन भरती न करता फसवणूक केल्याप्रकरणी प्रदीप विठ्ठल काळे, वय २८, राहणार कोळे, तालुका कराड याच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वडूज पोलीस ठाण्यातून मंगळवारी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार एनकूळ, ता. खटाव येथील मुकेश वामन तुपे यांनी फिर्याद दिली आहे.