परभणी तालुक्यातील तरोडा, दैठणा व मानवत तालुक्यातील ताडबोरगाव, इळद, देवलगाव अवचार, मगर सावंगी आदी ठिकाणी शनिवार 20 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता पासून आमदार राजेश विटेकर यांनी भेट देऊन अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांवर आलेले संकट अतिशय भयावह आहे. नैसर्गिक आपत्तीपुढे शेतकरी हतबल झाला आहे. तरीही, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. माझ्यासह महायुतीचे सरकार आपल्यासोबत आहे. आपले सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, भरघोस आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे आता