आज दिनांक 26 सप्टेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार तालुक्यातील असलेल्या ब्राह्मणवाडा थडी येथे एका सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार दिनांक 25 सप्टेंबरला एक वाजून सात मिनिटांनी पीडित मुलीने ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. यातील आरोपीने कॉलेजला जात असताना छुपा पाठलाग करून मोबाईल नंबर मागून जवळीक साधण्याचा प्रयत्न केले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी ब्राह्मणवाडा येथील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे