टिटवाळा परिसराच्या गणेश नगर येथे राहत असलेल्या रिया अन्सारी आणि सीना अन्सारी या दोन मुली दुपारच्या सुमारास काळू नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना व्हिडिओ बनवत होत्या. मात्र तोच व्हिडिओ अखेरचा ठरला. कपडे धुताना ओढणी पाण्यात वाहत असताना ते पकडण्यासाठी दोघीही पुढे गेल्या मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि रियाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आला मात्र सिनाचा मृतदेह सापडला नसल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली आहे.