हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी 25 ऑगस्ट ला दुपारी 4 वाजून तीस मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार जुगार खेळणाऱ्या 50 आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.