दिग्रस तालुक्यातील मोख क्र. २ जवळील नाल्यात आज दि. २६ ऑगस्ट सकाळी ११ वाजताच्या दरम्यान एका ३५ युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली. हिम्मत छगन राठोड वय ३५ वर्ष रा. मोख असे मृतक युवकाचे नाव आहे. नाल्यात मृतदेह दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्या बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.