गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, धुळेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र शहरातील पारोळा रोड, जुना आग्रा रोड, स्टेशन रोड, साक्री रोड तसेच देवपूर भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. या मुख्य मार्गांवरूनच बाप्पाच्या भव्य मिरवणुका निघणार असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे कोणतेही विघ्न टाळण्यासाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी नागरिक व गणेश मंडळांकडून होत आहे.