पाचोरा येथे आज दिनांक 7 सप्टेंबर रविवार रोजी 1500 वा जशने ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी 9 वाजता सर्व मुस्लिम बांधव नूर मशीद आठवडे बाजार पाचोरा येथे जमा झाले. येथून जुलूस ची सुरुवात झाली. समाज बांधवांनी मिरवणूक काढली. आठवडे बाजार, हुंसैनी चौक, पिंजरवाडा, देशमुख वाडी, नगरपालिका, आंबेडकर चौक, शिवाजी महाराज चौक, मुल्ला वाडा, सोनार गल्ली असा मिरवणूकच्या मार्ग होता, नंतर नूर मशीद येथे मिरवणूक संपली.