आज शनिवार दि ३० ऑगस्ट २०२५ रोजी लसाकम या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातील नियोजन भवन येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद पाटील तिडके बोंढारकर यांनी कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया आज दुपारी देताना त्यांनी म्हटले की,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सभागृहात मागणी करणार आ