स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका मोठ्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईत 2 लाख 40 हजार 100 रुपये किमतीचा 4 किलो गांजा जप्त केला असून, या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार 26 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास करण्यात आली आहे. नंदादीप नामदेव वाघदरे (29, रा. लांजा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस. क्ट 1985 च्या कलम 8 (क) आणि 20 (ब)(अ) अंतर्गत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे