धुळे तालुक्यातील कावठी-मेहेरगाव रस्त्यावर ९ ऑगस्ट रोजी सकाळी दुचाकी घसरून भीषण अपघात झाला. यात चालक दादाभाऊ यादव मोरे (४०) यांचा मृत्यू झाला, तर मागे बसलेले हिरामण गजा वाघ (४२) गंभीर जखमी झाले. उपचारानंतर २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी वाघ यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक बोरसे करत आहेत.