बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या सुगाव गावातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनातून कोणताही तोडगा निघत नसल्याने आलेल्या नैराश्यातून नितीन माणिकराव चव्हाण या तरुणाने आत्महत्या केली.