वेकोली वणी क्षेत्राच्या बेलोरा-नायगाव कोळसा खाणीत राष्ट्रपीता महात्मा गांधी तथा माजी दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात संयुक्तपणे साजरी करण्यात आली. यावेळी खाण प्रबंधक संदिप वागळे तथा इतर मान्यवर ऊपस्थीत होते. प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचे पुजन करण्यात आले. यावेळी खाण प्रबंधक वागळे व इतर मान्यवरांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जिवनकार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.