धोत्रे ग्रामपंचायत सदस्य आजमभाई शेख यांनी आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा. कोल्हे गटात प्रवेश केल्याने काळे गटाला धक्का बसला आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.कोल्हे कारखाना संचालक बाळासाहेब वत्ते लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण, उपसरपंच भाऊसाहेब गागरे, माजी उपसरपंच भगवानराव चव्हाण, किरण चव्हाण, विजय जामदार, सुरेश जाधव, जयवंत शिंदे, शेषराव शिंदे, सागर शिंदे, शाहरुख सय्यद आदींसह मान्यवर उपस्थित होते.