पहिल्या पत्नीस घटस्फोट न देता फसवणूक करून दुसरे लग्न केल्यानंतर विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा प्रकार सांगलीत उघडकीस आला आहे. याबाबत पती कैस आफताब शेख (वय ४०), पहिली पत्नी जीनत शेख (वय ३६), सासू जोहरा शेख (वय ५५), सासरा आफताब अब्दुलरेहमान शेख (वय ६०), दीर फिरोज शेख (वय ३८), जाऊ सुलताना फिरोज शेख (वय ३२, रा. मॉडर्न कॉलनी, शामरावनगर सांगली ) यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोसीन कैस शेख (वय ३१, सध्या रा. न्यू शाहूपुरी,कोल्हापूर) यांनी याबाब