वेकोलि खाण परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्था व इतर मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सोमवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून उकणी येथील खाण रोडवरील बसस्टॉपजवळ हे विराट चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तब्बल साडेतीन तास चालले. आंदोलनात सुमारे 300 पेक्षा अधिक आंदोलक सहभागी झाले होते. वेकोलिच्या आश्वासनानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.