रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम करणाऱ्या परराज्यातील कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. त्यांच्याकडून १ लाख ५ हजार रुपये किमतीचे ८ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, दोन घरफोडीचे गुन्हेही उघडकीस आले आहेत.