बाळापुर तालुक्यातील धनेगाव येथील श्रीराम समर्थ निकोडे वय ९० वर्ष हे बऱ्याच वर्षापासून आजाराने त्रस्त असून घरात चिडचिड करत होते.त्यामुळे आजार पणाला कंटाळून त्यांनी राहत्या घरी धनेगाव येथे काहीतरी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले.अशी फिर्याद मुरलीधर श्रीराम निकोडे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला सकाळी दिली असता,पोलिसांनी घटनास्थळचा पंचनामा करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणी करता ग्रामीण रुग्णालय बाळापूर येथे रवाना करून आकस्मिक मृत्यू ची नोंद केली.पुढील तपास सुरु आहे