शहरातील सोनू चौक ते टेलीफोन एक्सचेंज चौक मच्छी साथ पर्यंत रस्ता रुंदीकरण कार्य प्रगतीपथावर आहे. आज शनिवारी सोनू चौक ते टेलिफोन एक्सचेंज चौक पर्यंत जुन्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाजूने प्रशस्त नाली बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला असून या मार्गावरती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर चिखल व घाण पाणी साचते त्यामुळे या मार्गावर होत असणाऱ्या या नवीन नाली कामामुळे या मार्गावर होणारी सांडपाणी चिखलाची समस्या कायमची संपणार आहे.