बस स्थानक रामटेक येथील सार्वजनिक शौचालयाचे गडर टँकचे कव्हर् स्लॅब फुटल्याने ते उघडे पडले आहे. यातून परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक व प्रवाशांना मोठा त्रास होत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची बाब गुरुवार दि. 28 ऑगस्टला सकाळी साडेअकरा वाजता च्या दरम्यान लक्षात आली. याबाबत रामटेक डेपो व्यवस्थापक श्रीमती तिवारी यांचेकडे विचारणा केली असता तिथे गाडी जायला जागा नव्हती. दोन दिवसात कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.