भाजप नेते किरीट सोमय्या जळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी निषेध करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना आज 1 सप्टेंबर रोजी दुपारी 5 ला ताब्यात घेतले. सोमय्या यांनी यापूर्वीच ट्विट करत सिल्लोड येथे त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर जळगाव पोलिसांनी अलर्ट मोडवर काम करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना थांबवले.