औसा -औसा तालुक्यातील भादा येथे सिरातुन्नबींच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून यावेळी सध्याच्या जीवन शैलीत हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन पद्धतीचे आचरण केल्यास यश प्राप्त होईल असे प्रतिपादन हजरत मौलाना कलिमुल्लाह शाह यांनी केले आहे. अशी माहिती आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.