शिरूर शहरातील बाबुराव नगर परिसरात पोलिसांच्या वेशातल्या दोन बनावट पोलिसांनी वृद्ध व्यक्तीला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'आम्ही पोलीस आहोत' असा खोटा आव आणून वृद्धाच्या गळ्यातील व हातातील सोन्याचे दागिने काढून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.