दहशतवाद विरोधी पथकाने पवनी तालुक्यातील एका लॉजवर धाड टाकून वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी लॉजचा मालक व्यंकटेश बागडे (वय ४४) आणि त्याचा सहकारी अजय नागेश्वर (वय २६) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना इटगाव-कुर्झा रोडवरील एका लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान एक बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. जेव्हा बनावट ग्राहक आणि आरोपींमध्ये सौदा सुरू होता...