गेवराई शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात लक्ष्मण हाके यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, माझे पुतळे काय जाळतो… मलाच जाळ असं थेट आव्हान लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह त्यांच्या समर्थकांना दिलंय. हाके म्हणाले, 'कुणाच्याही दहशतीखाली राहणारे आम्ही नाही आहोत. गावगाड्यामध्ये राहणारे आम्ही आहोत. बास झालं तुमचं शोषण, तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतो. आम्ही सुद्धा मर्दाची औलाद आहे. तुम्ही सत्ताधारी निवडून आलेले आमदार एक बाजू कशी घेऊ शकता