नरंदे येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराचा नुकताच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सदर कामगार उत्तर प्रदेशातील असून, मृतदेह मूळ गावी नेण्यास अनेक अडचणी आल्या.आर्थिक परिस्थिती हलाखीची असून,वाहतूक व प्रशासनिक परवानग्यांच्या अडचणीमुळे मृतदेह उत्तर प्रदेशात नेणे अशक्य झाले.या कठीण प्रसंगी हातकणंगले येथील नागरिकांनी व समर्पण सेवाभावी संस्था या संस्थेचे स्वप्निल नरुटे यांनी पुढाकार घेत,माणुसकीचे उदाहरण समोर ठेवले.