बाराव्या शतकातील तत्वज्ञ व समाजसुधारक तसेच महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त आज २५ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी साडे बारा वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासन केंद्रात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्यावतीने श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन अभिवादन केले.