धुळे: तालुक्यातील सावळदे शिवारात विषारी औषध प्राशन केल्याने राहुल हरिचंद बारेला (वय २०) या मजुरी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री त्याने विष घेतल्याचे कुटुंबीयांना सांगितले, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, या घटनेची नोंद मोहाडी नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे व पोलीस अधिक तपास करत आहेत.