दर्यापूर-अमरावती मार्गावरील धनंजय लाज जवळ आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास एका ५० वर्षीय इसमाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.त्या इसमाचा लावारिस मृतदेह रस्त्यावर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.मृत व्यक्तीची ओळख राजेश अभिमानजी इंगळे (वय अंदाजे ५० ते ५५ रा. सैनिक कॉलनी, दर्यापूर) असे सांगितल्या जात आहे. घटनेची माहिती दर्यापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाजवळ पाहणी केली असता त्यांच्या अंगात पांढरा शर्ट, काळा पँट परिधान केल्याचे आढळून आले.