पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात एमएमसी प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेट स्पर्धेला जल्लोषात सुरुवात झाली. मैदानावर विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, मिताली राज, पी.व्ही. सिंधू यांसारख्या दिग्गज क्रीडापटूंच्या नावाने २४ टीम्स तयार करण्यात आल्या असून प्रत्येक टीमचे ओनर महाविद्यालयातील प्राध्यापक होते. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा आय