आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे मोठे कॉम्बिंग ऑपरेशन हाती घेतले. पहाटे चार वाजल्यापासून ते नऊपर्यंत झालेल्या या कारवाईत शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्या तब्बल २५ सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही मोहीम सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे आणि पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथकांमार्फत पार पडली.