वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र असलेले तसेच मुख्यमंत्र्याची ओ एस डी अमोल पाटणकर यांची महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव पदी पदोन्नती झाल्याच्या निमित्ताने दिनांक 31 ऑगस्ट रोजी भुतडा हॉस्पिटल येथे वाशिम जिल्हा माहेश्वरी समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे वाशिम शहराचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा, गिरीधारीजी सारडा, तसेच बहुसंख्य वाशिम शहरातील माहेश्वरी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या वतीने निलेश सोमानी, ओम ओलोकार, राम धनगर आणि सुनील कांबळे यांनी सत्कार केला.