मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपले जीवन संपवणाऱ्या भारत खरसाडे या तरुणाच्या कुटुंबियांना आमदार तानाजी सावंत यांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना तीन लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली. मिळालेल्या माहितीनुसार, भारत खरसाडे याला मुंबईत सुरु असलेल्या मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी जायचे होते. त्यासाठी त्याने घरच्यांकडे केवळ दोन हजार रुपयांची मागणी केली होती. न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली होती.