क्रांतीसूर्य शेती व शिक्षण विकास संस्था, महाराष्ट्र राज्य आयोजित क्रांतीसूर्य कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२५ शिर्डी येथे गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आदर्श निर्माण करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात अलिबागचे निष्णांत कायदेतज्ञ अॅड. अजय यशवंत उपाध्ये यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल क्रांतीसूर्य २०२५ ने गौरविण्यात आले.