जळगांव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनी व अकोला सिटी संघाच्या बॉक्सरांनी ८ सुवर्ण, ४ रजत व ९ कांस्य अशी एकूण २१ पदके पटकावून राज्यात अव्वल कामगिरी केली. U-१९ युथ गटात ४ सुवर्णांसह क्रीडा प्रबोधिनीने, तर U-१३ कॅडेट गटात ३ सुवर्णांसह अकोला सिटीने प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल जिल्हाधिकारी वर्षा मिना, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांच्यासह अनेक मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.अशी माहिती दिनांक