वाशी तालुक्यातील भाटसांगवी येथील बांधव जरांगे पाटील यांच्या मोर्चासाठी निघाले असताना त्यांचा पिकअप वाहनाचा अपघात झाला. या अपघातात वाहन पलटी होऊन चार जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघातग्रस्तांना तातडीने अँब्युलन्सद्वारे वाशी येथून उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती कळताच मोठ्या संख्येने समाजबांधव मदतीसाठी धावले. भाटसांगवी येथील युवकांनी पलटी झालेले पिकअप वाहन पुन्हा उभे करून सुस्थितीत केले.