आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर सुरु करण्यात आलेल्या आजपासुनच्या आमरण उपोषणस्थळी उपोषणकर्ते दत्ता सुर्यवंशी हडसणीकर यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल यांनी आजपासून आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण ऊपोषणाला बसलो असल्याचे म्हटले आहे.